चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?
संपादक, आजचा सुधारक यांस, जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे. १) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून …